लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत तीन पराभव झाल्याने यजमान इंग्लड संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा धुसर झाल्या आहेत. मात्र मंगळवारी ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतरही इंग्लडचा खेळाडू बेन स्टोक्सने 'हा विश्वकरंडक आमचाच' असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर उपांत्य फेरीचा मार्ग खडतर बनला आहे.
विश्वकरंडक स्पर्धेत धमाकेदार सुरूवात करुन इंग्लड संघाने आपण विश्वविजेतेपदाचे दावेदार असल्याचे म्हटले होते. मात्र, या स्पर्धेत इंग्लडला तीन पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लडला पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघानी पराभव केला आहे. तीन पराभवानंतरही इंग्लडचा खेळाडू बेन स्टोक्स विश्वकरंडक आमचाच असल्याचे म्हणाला.
मागील ४ वर्षापासून आम्हाला चाहत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. यामुळे आम्हाला माहित आहे की हा विश्वकरंडक आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आम्ही यासाठी मागे हटणार नसल्याचे बेन स्टोक्स म्हणाला. ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या सामन्यात बेन स्टोक्सने ८९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न स्ट्रार्कने टाकलेल्या 'यार्कर'मुळे अपयशी ठरला.
या स्पर्धेत इंग्डचे आणखी दोन सामने शिल्लक असून या दोन्ही सामन्यात इंग्लडला विजय मिळवावा लागणार आहे. इंग्लडला ३० जूनला भारत आणि ३ जुलैला न्यूझीलंड विरुध्द सामना खेळावयाचा आहे. इतिहास पाहता मागील २७ वर्षात इंग्लडने दोन्ही संघाला विश्वकरंडक स्पर्धेत एकदाही पराभूत केलेले नाही