ETV Bharat / sports

इयान मॉर्गनचा धोनीला धोबीपछाड, मोठ्या विक्रमात टाकले मागे - morgan beat dhoni in sixes

यापूर्वी हा विक्रम भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. कर्णधार म्हणून धोनीने एकूण २११ आंतरराष्ट्रीय षटकार लगावले आहेत. मात्र, मॉर्गनने आता धोनीला मागे टाकले आहे. मॉर्गनकडे आता कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१२ षटकार आहेत. त्याने आपल्या १६३व्या सामन्यात ही कामगिरी केली.

England skipper eoin morgan overtakes ms dhoni to record most sixes by international captain
इयान मॉर्गनचा धोनीला धोबीपछाड, मोठ्या विक्रमात टाकले मागे
author img

By

Published : Aug 5, 2020, 12:50 PM IST

हैदराबाद - इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार इयान मॉर्गनने आयर्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. या सामन्यात मॉर्गनने १०६ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत १५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. या खेळीमुळे तो आता कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी हा विक्रम भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. कर्णधार म्हणून धोनीने एकूण २११ आंतरराष्ट्रीय षटकार लगावले आहेत. मात्र, मॉर्गनने आता धोनीला मागे टाकले आहे. मॉर्गनकडे आता कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१२ षटकार आहेत. त्याने आपल्या १६३व्या सामन्यात ही कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग (१७१ षटकार) कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर, चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्क्युलम आहे. त्याच्या नावावर १७० षटकार आहेत.

या विक्रमासह मॉर्गनने आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय कारकिर्दीचे १३वे शतक ठोकले. इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक ठोकण्याच्या बाबतीत आता तो दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने १२ शतके केलेल्या मायकेल ट्रेस्कोथिकला मागे टाकले. तर पहिल्या क्रमांकावर १६ शतकांसह जो रूट विराजमान आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.