ETV Bharat / sports

WHAT A START!!..नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटपटूने केला साखरपुडा

स्टुअर्ट ब्रॉडने मॉडेल आणि गायिका मोली किंगसोबत साखरपुडा केला. या दोघांनी सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या साखरपुड्याची घोषणा केली. ब्रॉडने मोली किंगचे चुंबन घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ''२०२१ हे योग्य पद्धतीने सुरू'', असे ब्रॉडने लिहिले.

england pacer Stuart Broad engages with his girlfriend Molly King
WHAT A START!!..नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटपटूने केला साखरपुडा
author img

By

Published : Jan 3, 2021, 10:42 AM IST

लंडन - २०२०च्या पहिल्या दिवशी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने दुबईमध्ये अभिनेत्री नताशा स्टानकोविचसोबत साखरपुडा केला होता. आता यावर्षीही एका क्रिकेटपटूने साखरपुडा करत नववर्षाचे जोरदार स्वागत केले आहे. इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केला आहे.

england pacer Stuart Broad engages with his girlfriend Molly King
स्टुअर्ट ब्रॉड आणि मोली किंग

हेही वाचा - रैनाने सोडले मौन, 'या' कारणासाठी आयपीएलमधून घेतली माघार

स्टुअर्ट ब्रॉडने मॉडेल आणि गायिका मोली किंगसोबत साखरपुडा केला. या दोघांनी सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या साखरपुड्याची घोषणा केली. ब्रॉडने मोली किंगचे चुंबन घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ''२०२१ हे योग्य पद्धतीने सुरू'', असे ब्रॉडने लिहिले. त्यावर मोली म्हणाली, ''एक हजारवेळा हो, माझा अजूनही विश्वास बसत नाही. नव्या वर्षाची जादुई सुरुवात. तुझ्यासोबत पुढचे वर्ष घालवण्यासाठी आता थांबू शकत नाही.''

WHAT A START!!

मार्च २०१२ मध्ये स्टुअर्ट आणि मोलीची भेट झाली होती. पण ऑगस्ट २०१८ साली दोघे वेगळे झाले होते. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हे दोघे पुन्हा एकत्र आले. अखेर या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी साखरपुडा करत दोघांनी आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.

स्टुअर्ट ब्रॉडची कारकीर्द -

स्टुअर्ट ब्रॉडने २००६मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने १४३ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ५१४ विकेट्स आणि ३३३५ धावांची कामगिरी केली आहे. तसेच १२१ एकदिवसीय सामन्यात १७८ विकेट्स आणि ५२९ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त टी-२० क्रिकेटमध्ये ५६ सामने खेळत ६५ विकेट्स आणि ११८ धावा केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.