लंडन - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड वेस्ट इंडिजबरोबर होणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी गोलंदाजीची मदार जोफ्रा आर्चर आणि मार्क वुडवर असणार आहे.
एका वृत्तानुसार, ''ब्रॉड या सामन्यात खेळला नाही तर, घरच्या सामन्यासाठी तो प्रथमच आठ वर्षानंतर संघाबाहेर असेल.'' 2012 पासून इंग्लंडमध्ये खेळताना ब्रॉड कधीही संघाबाहेर नव्हता.
इंग्लंड संघाचे आगामी वेळापत्रक खूप व्यस्त आहे. विंडीजनंतर त्याला पाकिस्तानबरोबर तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. पहिला कसोटी सामना बुधवारी एजेस बाऊल मैदानावर सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे कोरोनाव्हायरस नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जात आहे. अशा परिस्थितीत या मालिकेचा उत्साह प्रेक्षकांमध्येही शिखरावर आहे. उभय संघात ही मालिका विनाप्रेक्षक खेळण्यात येणार आहेत. दुसरा 16 ते 20 जुलै दरम्यान आणि तिसरा 24 ते 28 जुलै या काळात खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने ओल्ड ट्रँफर्ड मैदानात खेळले जाणार आहेत. दरम्यान, खेळाडूंची राहण्याची व्यवस्था स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या जवळपास असलेल्या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.