मँचेस्टर - बेन स्टोक्स (176) आणि डॉम सिब्ले (120) यांच्या 260 धावांच्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपला पहिला डाव 9 बाद 469 धावांवर घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजने 1 बाद 32 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या सॅम करनने सलामीवीर जॉल कॅम्पबेलला 12 धावांवर माघारी धाडले. विंडीजकडून क्रेग ब्रेथवेट 6 आणि अल्झारी जोसेफ 14 धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून विंडीजने इंग्लंडला फलंदाजीचे निमंत्रण दिले. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी 3 बाद 207 धावांवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. द्विशतकाकडे कूच करणारा स्टोक्स चहापानानंतर 4 धावा काढून बाद झाला. त्याने 356 चेंडूंचा सामना करत आणि 17 चौकार आणि दोन षटकार टोलवत 176 धावा केल्या. तर, सिब्लेने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. त्याने 312 चेंडूत शतक पूर्ण केले. 1990 पासून इंग्लंडचे हे पाचवे संथ शतक आहे.
-
Best cricketer in the world 👑
— England Cricket (@englandcricket) July 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard/Videos: https://t.co/uLg0r9IjHB#ENGvWI pic.twitter.com/eGoWNbGnGu
">Best cricketer in the world 👑
— England Cricket (@englandcricket) July 17, 2020
Scorecard/Videos: https://t.co/uLg0r9IjHB#ENGvWI pic.twitter.com/eGoWNbGnGuBest cricketer in the world 👑
— England Cricket (@englandcricket) July 17, 2020
Scorecard/Videos: https://t.co/uLg0r9IjHB#ENGvWI pic.twitter.com/eGoWNbGnGu
त्यानंतर आलेल्या जोस बटलरला होल्डरने 40 धावांवर झेलबाद केले. त्याचा झेल जोसेफने पकडला. डोम बेस 31 आणि स्टुअर्ट ब्रॉड 11 धावांवर नाबाद राहिला. विंडीजकडून फिरकीपटू रोस्टन चेसने 172 धावांत 5 बळी घेतले. तर, केमार रोचला 2 आणि अल्झारी जोसेफ आणि जेसन होल्डरला प्रत्येकी एक बळी मिळाला आहे.