लंडन - कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी, इंग्लंडच्या पुरुष व महिला क्रिकेटपटूंनी त्यांच्या पगारात कपात करून ५ लाख पौंड दान देण्याचे ठरवले आहे. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास ४ कोटी ६८ लाख इतकी होते.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने खेळाडूंच्या पगारात २० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला खेळाडूंनी होकार दर्शवला आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाला आता संलग्न क्रिकेट संघटनांच्या उत्तराची प्रतीक्षेत आहेत.
खेळाडूंच्या एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या पगारात २० टक्के कपात करण्यात येणार आहे. याविषयी खेळाडूंनी सांगितलं, की 'करारबद्ध खेळाडूंशी झालेल्या बैठकीत सर्व खेळाडूंशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर पगार कपातीचा प्रस्ताव मान्य केला.'
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने आपल्या निवेदनात, जमा होणारी रक्कम कोणाला दान करायची, याचा निर्णय खेळाडू पुढील आठवड्यात घेतील. ही पगार कपात २० टक्के इतकी आहे, असे सांगितले आहे.
दरम्यान, याआधी इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटरलने २०१९च्या विश्वकरंडक विजेत्या संघाची जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून उभी राहणारी रक्कम तो कोरोना लढ्यासाठी देणार आहे. याशिवाय महिला संघाची कर्णधार हिथर नाईट नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये वॉलेंटियर म्हणून सहभागी झाली आहे.
हेही वाचा - WC२०११ : सुरेश रैना म्हणाला, 'हा' खेळाडू होता गोलंदाजी विभागाचा 'सचिन'
हेही वाचा - मॅच फिक्सिंग करणाऱ्या खेळाडूंना फासावर लटकवा, जावेद मियाँदाद यांची मागणी