नवी दिल्ली - इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ECB) आगामी वनडे आयसीसी विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व इऑन मॉर्गनकडे देण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडचा पहिला सामना ३० मेला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला लॉडर्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.
-
🚨 BREAKING NEWS 🚨
— England Cricket (@englandcricket) April 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
We have named our preliminary 15-man squad for the @cricketworldcup!
➡️ https://t.co/7Cijzcrv4B#CWC19 pic.twitter.com/TQUH1FqpVg
">🚨 BREAKING NEWS 🚨
— England Cricket (@englandcricket) April 17, 2019
We have named our preliminary 15-man squad for the @cricketworldcup!
➡️ https://t.co/7Cijzcrv4B#CWC19 pic.twitter.com/TQUH1FqpVg🚨 BREAKING NEWS 🚨
— England Cricket (@englandcricket) April 17, 2019
We have named our preliminary 15-man squad for the @cricketworldcup!
➡️ https://t.co/7Cijzcrv4B#CWC19 pic.twitter.com/TQUH1FqpVg
इंग्लंडने आपल्या संघात अष्ठपैलू खेळाडूंना मोठ्या प्रमाणात स्थान दिले आहे. बेन स्टोक्स, मार्क वुड, मोईन अली, क्रिस वोक्स, टॉम करन यांना संघात स्थान देण्यात आले आहे. मोइन व्यतीरीक्त लेग स्पिनर आदील रशीदचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
-
BREAKING: @englandcricket announce their #CWC19 squad! pic.twitter.com/kInGrqpgUx
— Cricket World Cup (@cricketworldcup) April 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BREAKING: @englandcricket announce their #CWC19 squad! pic.twitter.com/kInGrqpgUx
— Cricket World Cup (@cricketworldcup) April 17, 2019BREAKING: @englandcricket announce their #CWC19 squad! pic.twitter.com/kInGrqpgUx
— Cricket World Cup (@cricketworldcup) April 17, 2019
विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडचा १५ सदस्यीय संघ
इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, टॉम करन, जो डेनली, अॅलेक्स हेल्स, लिएम प्लंकेट, आदील रशीद, जो रुट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.