ETV Bharat / sports

थरारक सामन्यात इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर एक गडी राखून विजय; मालिकेतील आव्हान कायम - बेन स्टोक्स सामनावीर

इंग्लंड येथे सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंग्लंडने जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. बेन स्टोक्सच्या शतकी (नाबाद१३५) खेळीच्या बळावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

बेन स्टोक्स सामनावीर
author img

By

Published : Aug 25, 2019, 11:45 PM IST

हेडिंग्ले - इंग्लंड येथे सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. बेन स्टोक्सच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. नाबाद १३५ (२२९) धावांची खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सला सामनावीर घोषित करण्यात आले.

थरारक सामन्यात इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर एक गडी राखून विजय

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी इंग्लंडसमोर ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला अवघ्या ६७ धावांत गुंडाळल्यानंतर दुसऱ्या डावातही इंग्लंची सुरुवात निराशाजनकच झाली. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार जो रूट(७७)ने जो डेन्ली(५०)च्या साथीने धावफलक हालता ठेवला. यानंतर, सामनावीर बेन स्टोक्सने एकाकी किल्ला लढवत संघाचा पराभव टाळला. या विजयासह इंग्लंडने मालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे. मालिकेतील चौथा सामना ४ ते ८ सप्टेंबरच्या दरम्यान ओल्ड ट्रफर्ड येथे खेळवण्यात येणार आहे.

Intro:Body:

sport

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.