लंडन - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघात होणारी मर्यादित षटकांची मालिका कोरोना व्हायरसमुळे सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) असे निदर्शनास आणले आहे की जुलै महिन्यात ही मालिका शक्य नाही. त्यामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात येईल.
इंग्लंडचा संघ ३ ते १६ जुलै दरम्यान ऑस्ट्रेलियासह तीन टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. जर या मालिकेच्या तारखा बदलल्या तर इंग्लंडला पाकिस्तानविरूद्धची मालिका संपवून ऑस्ट्रेलियाविरुद्ध थेट मैदानात उतरावे लागेल. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मालिका २ सप्टेंबरला संपणार आहे.
या अहवालात म्हटले आहे, की ईसीबीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला नवीन तारखा सादर केल्या आहेत जेणेकरुन ते प्रेक्षकांच्या उपस्थितीत मालिका आयोजित करू शकतील. रिक्त स्टेडियमऐवजी प्रेक्षकांच्या उपस्थितीत दोन्ही मंडळांना मालिका आयोजित करण्याची इच्छा असल्याने सीएने नवीन तारखांवर कामही सुरू केले आहे.