ETV Bharat / sports

पाकिस्तानविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा - eng vs pak t20 squad

या टी-२० मालिकेचा पहिला सामना २८ ऑगस्टला, दुसरा सामना ३० ऑगस्टला आणि तिसरा सामना १ सप्टेंबरला होणार आहे. हे तीनही सामने मॅँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळले जातील. संघाचे नेतृत्व इयान मॉर्गन करणार आहे. त्याचबरोबर टी-२० संघात डेव्हिड मालन आणि अष्टपैलू ख्रिस जॉर्डनचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे त्रस्त होते आणि आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संघाचा भाग नव्हते.

England announced the team for the t20 series against pakistan
पाकिस्तानविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा
author img

By

Published : Aug 19, 2020, 11:03 AM IST

लंडन - इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी १४ सदस्यीय संघाची घोषणा केली. पाकिस्तानविरूद्ध सुरू असलेल्या कसोटीतील इंग्लंडच्या खेळाडूंना या टी-२० संघात इंग्लंडने स्खान दिलेले नाही.

या टी-२० मालिकेचा पहिला सामना २८ ऑगस्टला, दुसरा सामना ३० ऑगस्टला आणि तिसरा सामना १ सप्टेंबरला होणार आहे. हे तीनही सामने मॅँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळले जातील. संघाचे नेतृत्व इयान मॉर्गन करणार आहे. त्याचबरोबर टी-२० संघात डेव्हिड मालन आणि अष्टपैलू ख्रिस जॉर्डनचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे त्रस्त होते आणि आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संघाचा भाग नव्हते.

यासह, सहाय्यक प्रशिक्षक ग्राहम थॉर्पे या टी-२० मालिकेसाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका साकारतील. त्याला सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड सहाय्य करेल, तर मार्कस ट्रेस्कोथिकला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे, असे ईसीबीने स्पष्ट केले.

इंग्लंडचा १४ सदस्यीय संघ : इयान मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), टॉम बंटन, सॅम बिलिंग्ज, टॉम करन, जो डेन्ली, लुईस जॉर्जी, ख्रिस जॉर्डन, शाकिब महमूद, डेव्हिड मालान, आदिल रशीद, जेसन रॉय , डेव्हिड विले.

राखीव खेळा डूः पॅट ब्राऊन, लियाम लिव्हिंगस्टोन, लीस टॉप्ले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.