ETV Bharat / sports

Eng vs Pak T20 Series: इंग्लंडच्या 'या' स्फोटक सलामीवीराने घेतली माघार

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज म्हटलं की, जेसन रॉयला ओल्ड ट्रैफर्ड मैदानात सरावादरम्यान, दुखापत झाली. ही बाब तपासणी दरम्यान दिसून आली. यामुळे रॉयने मालिकेतून माघार घेतली आहे. पण रॉय संघासोबतच राहणार आहे.

eng vs pak english batsman jason roy rules out of t20 series against pakistan
Eng vs Pak T20 Series: इंग्लंडच्या 'या' स्फोटक सलामीवीराने घेतली माघार
author img

By

Published : Aug 27, 2020, 6:47 PM IST

लंडन - कोरोनानंतर पहिल्यांदा क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या इंग्लंडने मायदेशात दोन कसोटी मालिका खेळल्या आणि त्या दोनही जिंकल्या. इंग्लंडने पहिल्यांदा वेस्ट इंडीजला २-१ अशा फरकाने पराभूत केले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत १-० असा विजय मिळवला. आता इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध ३ टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर जेसन रॉयने सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज म्हटलं की, जेसन रॉयला ओल्ड ट्रैफर्ड मैदानात सरावादरम्यान, दुखापत झाली. ही बाब तपासणी दरम्यान दिसून आली. यामुळे रॉयने मालिकेतून माघार घेतली आहे. पण रॉय संघासोबतच राहणार आहे.

जेसन रॉयचे लक्ष्य सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेवर असेल. रॉयने मागील ५ टी-२० सामन्यात ४० हून अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयने अर्धशतकी खेळी केली होती.

दरम्यान, जेसन रॉयच्या अनुपस्थितीत टॉम बँटनला जॉनी बेअरस्टोसोबत सलामीला येण्याची संधी मिळू शकते. २८ ऑगस्टपासून इंग्लंड आणि पाक यांच्यात टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. उभय संघातील तिनही सामने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानात खेळवण्यात येणार आहेत.

हेही वाचा - IPL 2020 : खेळाडू, फ्रेंचायझी आणि स्टाफ कर्मचाऱ्यांची दर पाचव्या दिवशी होणार कोरोना चाचणी

हेही वाचा - आयपीएल सुरू होण्याआधीच शाहरुखच्या केकेआरला धक्का; 'या' खेळाडूने घेतली माघार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.