ETV Bharat / sports

हॅमिल्टन कसोटी : उभय संघाला दुखापतीचे ग्रहण; बोल्ट, ग्रँडहोम नंतर इंग्लंडचा 'हा' खेळाडू जायंबदी

न्यूझीलंड आणि इंग्लंड संघात शुक्रवारपासून (२९ नोव्हेंबर) हॅमिल्टनच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अष्टपैलू क्रिकेटपटू कॉलिन डी ग्रँडहोम दुखापतीमुळे बाहेर पडले. त्यानंतर आता इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला दुखापत झाली. यामुळे तो हा सामना खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

eng vs nz 2nd test : Jos Buttler injury doubt for second Test; Ollie Pope would keep wicket
हॅमिल्टन कसोटी: उभय संघाला दुखापतीचे ग्रहण; बोल्ट, ग्रँडहोम नंतर इंग्लंडचा 'हा' खेळाडू जायंबदी
author img

By

Published : Nov 28, 2019, 3:46 PM IST

वेलिंग्टन - इंग्लंडचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. उभय संघात २ सामन्याची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने इंग्लंडला १ डाव ६५ धावांनी धूळ चारली. दुसरा सामना हॅमिल्टन येथे रंगणार असून या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचे दोन खेळाडू , तर इंग्लंडचा एक खेळाडू असे एकूण तीन खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.

न्यूझीलंड आणि इंग्लंड संघात शुक्रवारपासून (२९ नोव्हेंबर) हॅमिल्टनच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अष्टपैलू क्रिकेटपटू कॉलिन डी ग्रँडहोम दुखापतीमुळे बाहेर पडले. त्यानंतर आता इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला दुखापत झाली. यामुळे तो हा सामना खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

eng vs nz 2nd test : Jos Buttler injury doubt for second Test; Ollie Pope would keep wicket
जोस बटलर

पहिल्या कसोटी सामन्यात ग्रँडहोमने चांगली कामगिरी केली होती. त्याने ६५ धावांच्या महत्वपूर्ण खेळीसह ३ गडी बाद केले होते. पण त्याला स्नायूंच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने, दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याला बाहेर पडावे लागले. बोल्टला पहिल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी दुखापत झाली. यामुळे बोल्टला पहिला कसोटी सुरू असतानाच मैदान सोडावे लागले होते.

बोल्ट आणि ग्रँडहोमने नंतर आता इंग्लंडचा बटलर दुसरी कसोटी खेळणार नसल्याचे समजते. बटलरला सरावादरम्यान, दुखापत झाली आहे. यामुळे तो दुसरा सामना खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. बटलर जर दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही तर ओली पोपवर यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल, असे कर्णधार ज्यो रुटने सांगितले आहे. दरम्यान, पोपने आतापर्यंत केवळ तीन कसोटी सामन्यात यष्टीरक्षण केले आहे.

न्यूझीलंडने बोल्ट आणि ग्रँडहोमच्या दुखापतीमुळे, अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरिल मिशेलचा प्रथमच कसोटी संघात समावेश केला आहे, तर फिरकी गोलंदाज टॉड एस्टल आणि लॅाकी फर्ग्युसन यांनाही कसोटी संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा - कोलकात्यात अडकलायं बांगलादेशचा सलामीवीर, 'या' कारणानं झाला २१,६०० रुपयांचा दंड

हेही वाचा - मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : नामांकित खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.