सेंच्युरियन - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्समध्ये चालू सामन्यात वाद पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सेंच्युरियन येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ही घटना घडली.
हेही वाचा - टिम पेनची चपळाई, 'धोनी स्टाईल' स्टम्पिंगने फलंदाजाला धाडलं माघारी
या सामन्याच्या तिसर्या दिवशी ड्रिंक्स ब्रेक दरम्यान इंग्लंडचे खेळाडू बेन स्टोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड एकमेकांवर रागाने बोलताना दिसले. या सामन्यासाठी समालोचन करणारे इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन म्हणाले की, संघाच्या पेचप्रसंगी ब्रॉड आणि स्टोक्स आनंदी दिसत नाहीत. नासिर यांनी टिप्पणी केली की, 'मला असे वाटते ब्रॉड आणि स्टोक्स यांच्यात काही चर्चा झाली आहे. ब्रॉडने असे काही बोलले की संघाचा उपकर्णधार स्टोक्स रागात दिसत आहे.'
-
What did I miss? pic.twitter.com/0xWqxQv5Gw
— Kourageous ✨✨✨ (@AN_EVILSOUL) December 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">What did I miss? pic.twitter.com/0xWqxQv5Gw
— Kourageous ✨✨✨ (@AN_EVILSOUL) December 28, 2019What did I miss? pic.twitter.com/0xWqxQv5Gw
— Kourageous ✨✨✨ (@AN_EVILSOUL) December 28, 2019
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी अद्याप २५५ धावांची आवश्यकता आहे, त्यामुळे त्यांच्या संघावर दबाव निर्माण झाला आहे. दुसऱ्या डावात इंग्लंडने आतापर्यंत एक विकेट गमावून १२१ धावा केल्या आहेत.