ETV Bharat / sports

यॉर्कर टाकू नकोस, धोनीचा सल्ला पण बुमराहने टाकलचं; मग पुढे काय घडलं वाचा... - jasprit bumrah odi debut match

पदार्पणाच्या सामन्यात मी कर्णधार धोनीशी बोललो. यात मी त्याला विचारले की, डेथ ओव्हरमध्ये यॉर्कर लाईनवर गोलंदाजी करु का? यावर धोनीने, करु नको, असा सल्ला दिला. पण मी माझ्या पद्धतीनेच यॉर्कर लाईन गोलंदाजी केली. माझी गोलंदाजी पाहून धोनीने माझे कौतूक केले, असे बुमराहने सांगितले.

'Don't bowl yorkers', Jasprit Bumrah recalls how he changed MS Dhoni's perception of him on India debut
यॉर्कर टाकू नकोस, धोनीचा सल्ला, पण बुमराहने टाकलचं; मग पुढे काय घडलं वाचा...
author img

By

Published : Sep 10, 2020, 5:38 PM IST

मुंबई - जसप्रीत बुमराहच्या पारंपरिक चौकटीबाहेरच्या गोलंदाजीमुळे तो जगातील एक धोकादायक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात बुमराहने भारतीय संघात पदार्पण केले. पण, बुमराहने पदार्पणाच्या सामन्यात धोनीचा सल्ला ऐकला नव्हता, याची खुद्द कबुली बुमराहनेच दिली.

बुमराह एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना म्हणाला की, पदार्पणाच्या सामन्यात मी कर्णधार धोनीशी बोललो. यात मी त्याला विचारले की, डेथ ओव्हरमध्ये यॉर्कर लाईनवर गोलंदाजी करु का? यावर धोनीने, करु नको, असा सल्ला दिला. पण मी माझ्या पद्धतीनेच यॉर्कर लाईन गोलंदाजी केली. माझी गोलंदाजी पाहून धोनीने माझे कौतूक केले.

धोनी त्यावेळी म्हणाला की, तुला याआधीच भारतीय संघात यायला हवे होते. आपण ही मालिका जिंकू शकलो असतो. पहिलाच सामना होता, यामुळे मी आधीच नर्वस होतो. त्यात खुद्द कर्णधारच स्तुती केल्याने, मला आनंद झाला, असेही बुमराह म्हणाला.

धोनी यष्टीरक्षण दरम्यान गोलंदाजांना सल्ला देत असतो. त्याचा सल्ला बहुतांश वेळा फायदेशीर ठरला आहे. धोनीने जसप्रीत बुमराहला गोलंदाजी करताना पहिले नव्हते. यामुळे त्याने यॉर्कर लाईन गोलंदाजी करु नको, असा सल्ला दिला. पण, बुमराहने धोनीचा सल्ला ऐकला नाही. त्याने यॉर्कर लाईन गोलंदाजी करत धोनीचे मत परिवर्तन केले.

हेही वाचा - पिक्चर अभी बाकी है..! रोहितने सरावादरम्यान मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर; पाहा व्हिडिओ

हेही वाचा - चेन्नईच्या व्यावसायिकाने घातला हरभजनला ४ कोटींचा गंडा, पोलिसात तक्रार दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.