ETV Bharat / sports

इंग्लडचे तिकीट मिळवण्यात कार्तिक-शंकरला यश तर पंत आणि रायडूला पाहावी लागेल २०२३ ची वाट

इंग्लडमध्ये होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघामध्ये युवा खेळाडू ऋषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे. तर आश्चर्याची बाब म्हणजे अंबाती रायडू ऐवजी नवख्या विजय शंकरवर निवड समितीने 'मेहरनजर' दाखवली आहे. एम. एस. के प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीने भारतीय संघाची निवड केली आहे.

इंग्लडचे तिकीट मिळवण्यात कार्तिक-शंकरला यश तर पंत आणि रायडूला पाहावी लागेल २०२३ ची वाट
author img

By

Published : Apr 15, 2019, 7:27 PM IST

मुंबई - इंग्लडमध्ये होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघामध्ये युवा खेळाडू ऋषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे. तर आश्चर्याची बाब म्हणजे अंबाती रायडू ऐवजी नवख्या विजय शंकरवर निवड समितीने 'मेहरनजर' दाखवली आहे. एम. एस. के प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीने भारतीय संघाची निवड केली आहे.

कार्तिक आणि पंत या दोघांपैकी एकाची निवड करण्यासाठी आम्ही विचार केला. तेव्हा आम्हाला पंत ऐवजी कार्तिक हाच चांगला वाटला. जेव्हा महेंद्र सिंह धोनी संघात नसेल तेव्हा संघाला वाईट परिस्थितीतून शांत राहून बाहेर काढण्यासाठी अनुभवी खेळाडू असणे गरजे असल्याने कार्तिकला झुकते माप देण्यात आले, असे स्पष्टीकरण प्रसाद यांनी दिले आहे.

भारतीय संघात चौथ्या नंबरसाठी मोठी स्पर्धा होती. त्यात अंबाती रायडू यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, ऑस्ट्रेलिया विरोधातील मालिकेत रायडूला दर्जेदार खेळ करता आला नाही. यामुळे रायडूच्याजागी विजय शंकरची निवड करण्यात आली आहे. विजय शंकर हा इंडियन प्रिमियल लीगमध्ये सनराईजर्स हैदराबादकडून नंबर ३ व ४ खेळताना चांगला खेळ करत आहे. यामुळे निवड समितीने विजय शंकर याची निवड केली. शंकरच्या निवडीचे दुसरे कारण म्हणजे, इंग्लडमधील खेळपट्ट्या वेगवान असून शंकर वेगवान गोलंदाज म्हणून योग्य भूमिकाही पार पाडू शकतो.

विश्वचषकासाठी असा आहे भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), विजय शंकर, रवींद्र जडेजा

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.