ETV Bharat / sports

IPL २०२० : दिनेश कार्तिकच्या 'त्या' निर्णयावर गौतम 'गंभीर', म्हणाला.. - गौतम गंभीर न्यूज

दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद आयपीएलच्या मध्यातच सोडले. त्याच्या या निर्णयावर कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभीरने टीका केली आहे.

Dinesh Karthik's decision to leave KKR captaincy mid-way in IPL 2020 slammed by Gautam Gambhir
IPL २०२० : दिनेश कार्तिकच्या 'त्या' निर्णयावर गंभीर भडकला, म्हणाला...
author img

By

Published : Oct 31, 2020, 6:56 PM IST

मुंबई - दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद आयपीएलच्या मध्यातच सोडले. त्याच्या या निर्णयावर कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभीरने टीका केली आहे.

गौतम गंभीर म्हणाला की, 'कार्तिकने कर्णधारपद सोडणे हे फक्त मानसिकता दाखवते. कारण दिनेशला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे होते. पण त्याने फार काही साध्य होणार नाही.'

यासाठी गंभीरने स्वत:च्या उदाहरणाचा दाखला दिला. त्याने सांगितले की, २०१४ च्या हंगामात माझा फॉर्म हरपला होता. त्यावेळी तीन सामन्यात शून्यावर बाद झालो होतो. पण नंतर पुनरागमन केले मला कर्णधारपदामुळेच फॉर्ममध्ये येण्यास मदत झाली.'

कार्तिकने अचानक आपण फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली. त्यानंतर इयॉन मॉर्गनला कर्णधार सोपवण्यात आले. दरम्यान, आयपीएलच्या तेराव्या हंगामात अद्याप कोलकाताची कामगिरी फारशी उल्लेखनीय ठरलेली नाही. पण ते अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत.

क्वालिफायचे तिकीट कोणाला?

आयपीएलच्या १३ व्या हंगामात आतापर्यंत ५१ सामने झाले आहेत. बाद फेरीतील फक्त ५ सामने बाकी आहेत. तरी देखील अद्याप अंतिम चार संघ कोणते हे स्पष्ट झालेले नाही. मुंबई वगळता एकाही संघाचे क्वालिफायचे तिकिट पक्के झालेले नाही. अशातच ५ सामने, सहा संघ आणि तीन जागा असे गणित सद्यघडीला आहे.

...तर नेट रनरेटच्या आधारावर संघ ठरतील पात्र

पंजाब, राजस्थान, कोलकाता या संघाचे १३ सामन्यात १२ गुण आहेत. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरच्या सामन्यात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय आवश्यक आहे. हैदराबाद, दिल्ली, आरसीबी आणि मुंबई यांचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हैदराबादला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागेल. तर दिल्ली आणि आरसीबीला एका सामन्यात विजय अनिवार्य आहे. अन्यथा नेट रन रेटच्या आधारावर अंतिम चार स्थानांसाठी संघ क्वालिफाय होऊ शकतात.

हेही वाचा - DC vs MI : मुंबईचा नाद नाय करायचा.. दिल्लीवर ९ गडी राखून विजय

हेही वाचा - SRH vs RCB LIVE : थोड्याच वेळात होणार नाणेफेक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.