ETV Bharat / sports

महेंद्रसिंह धोनी चतूर खेळाडू, भारताच्या अष्टपैलू खेळाडूचं मत - महेंद्रसिंह धोनी

युसूफला लाईव्ह चॅट दरम्यान, त्याच्या सहकाऱ्यांविषयी एका शब्दात त्याचे मत मांडायला सांगितले. हा एक टास्क होता. त्याला पहिल्यांदा धोनीविषयी काय सांगशील असे विचारले असता, त्याने त्यावर 'क्लेव्हर' म्हणजे चतूर असे उत्तर दिले. त्यानंतर युसूफने युवराज सिंगबाबत 'रॉकस्टार' असे उत्तर दिले.

dhoni was described as clever while yuvraj was described as rockstar by yousuf pathan
महेंद्रसिंह धोनी चतूर खेळाडू, भारताच्या अष्टपैलू खेळाडूचं मत
author img

By

Published : May 2, 2020, 10:27 AM IST

मुंबई - लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी असलेले खेळाडू सोशल मीडियावर लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. अनेक खेळाडू लाईव्ह चॅटचा वापर करताना दिसून येत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण याने देखील इंन्स्टाग्राम लाईव्ह चॅट केला. यात त्याने क्रिकेट आणि त्याच्या करिअर संदर्भातील प्रश्नावर उत्तरं दिली.

युसूफला लाईव्ह चॅट दरम्यान, त्याच्या सहकाऱ्यांविषयी एका शब्दात त्याचे मत मांडायला सांगितले. हा एक टास्क होता. त्याला पहिल्यांदा धोनीविषयी काय सांगशील असे विचारले असता, त्याने त्यावर 'क्लेव्हर' म्हणजे चतुर असे उत्तर दिले. त्यानंतर युसूफने युवराज सिंगबाबत रॉकस्टार असे उत्तर दिले. या चॅट दरम्यान, युसूफने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर आणि राजस्थान रॉयल्स संघाचा माजी कर्णधार शेन वॉर्न यांचे कौतूक केले.

युसूफने शेन वॉर्न बाबत, तो असा लीडर आहे जो जिंकण्यास शिकवतो असे सांगितले. तर गौतम गंभीर इमोशनला कर्णधार असल्याचे युसूफने सांगितले. दरम्यान, रॉजस्थान रॉयल्स संघाने वॉर्नच्या नेतृत्त्वात आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद पटकावले होते. तर गंभीरच्या नेतृत्वात नाईट रायडर्सचा संघ २०१२ आणि २०१४ साली विजेता ठरला. युसूफ राजस्थान आणि कोलकाता संघाने विजेतेपद पटकवलेल्या संघाचा सदस्य राहिला आहे.

हेही वाचा - कपिल देव आणि इम्रान खान यांच्या तुलनेत हार्दिक कुठेच नाही, अब्दुल रझाकचे मत

हेही वाचा - उमर अकमलला अपस्मार आजार; पाक बोर्डाच्या माजी अध्यक्षांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.