दुबई - आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ५ गडी राखून पराभव करत विक्रमी पाचव्या आयपीएल जेतेपदाला गवसणी घातली. जेतेपद पटकावल्यानंतर मुंबई संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील खास शैलीत मुंबईच्या संघाचे कौतुक केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या संदर्भात एक ट्विट केले आहे. यात त्यांनी मुंबई संघाचे कौतुक केले आहे. 'पुन्हा एकदा आमची मुंबई इंडियन्स विजयी झाली. पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावल्याबद्दल संपूर्ण संघाचे मनापासून अभिनंदन. रोहित तू खरंच एक उत्तम कर्णधार आहेस. आम्हाला तुझा अभिमान वाटतो, असे फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
-
And once again amchi @mipaltan is the champion!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Congratulations team #MumbaiIndians for clinching the IPL title for the fifth time !@ImRo45 , you have been a great captain.
Proud of you all !#IPLfinal2020
">And once again amchi @mipaltan is the champion!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2020
Congratulations team #MumbaiIndians for clinching the IPL title for the fifth time !@ImRo45 , you have been a great captain.
Proud of you all !#IPLfinal2020And once again amchi @mipaltan is the champion!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2020
Congratulations team #MumbaiIndians for clinching the IPL title for the fifth time !@ImRo45 , you have been a great captain.
Proud of you all !#IPLfinal2020
असा रंगला सामना -
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ९६ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. पंतने ५६ तर श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी केली. १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या साथीने विजयाचा पाया रचला. रोहित ६८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
हेही वाचा - IPL २०२० : नाद नाय करायचा..! मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा जिंकलं विजेतेपद
हेही वाचा - IPLचे विजेतेपद पटकावल्यानंतर ठाकरे सरकारकडून मुंबई संघाचे कौतुक