जयपूर - सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या ४० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकांमध्ये ६ गडी गमावत १९१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने रिषभ पंतच्या ३६ चेंडूत ७८ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर १९.२ षटकांमध्ये ४ गडी गमावत मोठा विजय मिळवला. या विजयासह दिल्लीच्या संघाने आयपीएलच्या गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य रहाणेच्या दमदार १०५ धावांच्या शतकी तर कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या ५० धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १९१ धावा केल्या. दिल्लीकडून कॅगिसो रबाडाने सर्वाधिक २ विकेट घेतलेत. स्मिथ आणि रहाणे वगळता इतर कोणताही खेळाडूला जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही.
-
Pink City ko kal rang diya neela! 🔵
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Describe our performance last night in one word ❤️#RRvDC #ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/oCKYfDz8Rv
">Pink City ko kal rang diya neela! 🔵
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 23, 2019
Describe our performance last night in one word ❤️#RRvDC #ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/oCKYfDz8RvPink City ko kal rang diya neela! 🔵
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 23, 2019
Describe our performance last night in one word ❤️#RRvDC #ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/oCKYfDz8Rv
धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने धमाकेदार सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन २७ चेंडूत ५४ तर पृथ्वी शॉने ३९ चेंडूत ४२ धावा करत विजयाचा पाया रचला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने ७८ धावांची धमाकेदर फंलदाजी करत दिल्लीच्या विजयाचा कळस बांधला. राजस्थानकडून श्रेयस गोपालने २ तर धवल कुलकर्णी आणि रियान पराग यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. पंतच्या शानदार फलंदाजीसाठी त्याला सामनाविराचा पुरस्कार देण्यात आला.
-
Dada and Match-winners ♥
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
2002 <---> 2019, some things never change! 😍
Picture courtesy: M. Kaif#RRvDC #ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/UHifIARS74
">Dada and Match-winners ♥
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2019
2002 <---> 2019, some things never change! 😍
Picture courtesy: M. Kaif#RRvDC #ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/UHifIARS74Dada and Match-winners ♥
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2019
2002 <---> 2019, some things never change! 😍
Picture courtesy: M. Kaif#RRvDC #ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/UHifIARS74