ETV Bharat / sports

रायन हॅरिस...गोलंदाजांच्या मार्गदर्शनासाठी दिल्ली कॅपिटल्समध्ये नवे अस्त्र दाखल

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स होप्स कौटुंबिक कारणास्तव यूएईला जाऊ शकणार नाही. त्यामुळे तो गोलंदाजीच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडू शकणार नाही. होप्स २०१८ आणि २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता.

Delhi capitals name ryan harris as new bowling coach
रायन हॅरिस...गोलंदाजांच्या मार्गदर्शनासाठी दिल्ली कॅपिटल्सचे नवे अस्त्र
author img

By

Published : Aug 25, 2020, 2:40 PM IST

नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज रायन हॅरिसला आपला नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. ४० वर्षीय हॅरिस १९ सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या आयपीएलसाठी यूएईमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात सामील होईल.

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स होप्स कौटुंबिक कारणास्तव यूएईला जाऊ शकणार नाही. त्यामुळे तो गोलंदाजीच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडू शकणार नाही. होप्स २०१८ आणि २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता.

हॅरिस म्हणाला, "आयपीएलमधील पुनरागमनामुळे मला आनंद झाला आहे. आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद उंचावण्यासाठी माझ्यासाठी ही मोठी संधी आहे. दिल्लीकडे प्रभावी गोलंदाज आहेत. आता मी त्यांच्याबरोबर काम सुरू करण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. "

हॅरिसने आपल्या कारकिर्दीत २७ कसोटी सामन्यात ११३, एकदिवसीय २१ सामन्यात ४४ आणि ३ टी-२० सामन्यात ४ बळी घेतले आहेत. यापूर्वी तो किंग्ज इलेव्हन पंजाब आणि डेक्कन चार्जर्सच्या संघाचा सदस्य होता. या व्यतिरिक्त, तो २०१९ आयपीएलमध्ये पंजाबचा गोलंदाजी प्रशिक्षकही होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.