जयपूर - विजय हजारे करंडक स्पर्धेत दिल्लीविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाला पराभवास सामोरे जावे लागले. शिखर धवनच्या शतकीच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने हा सामना ३ गडी राखून जिंकला. शिखरने ११८ चेंडूत १५३ धावांची वादळी खेळी केली.
महाराष्ट्राच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ७ बाद ३२८ धावा केल्या. यात केदार जाधव (८६) तर अजिम काझीने ९१ धावांची खेळी केली. याशिवाय यश नायरने ४५ तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने १३ धावांची खेळी केली. दिल्लीकडून ललित यादवने तीन, प्रदिप सांगवान याने २ गडी बाद केले. तर कुलवंत आणि सिमरनजीतने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.
महाराष्ट्राने दिलेले हे आव्हान दिल्लीने शिखर धवनच्या खेळीच्या जोरावर ४९.२ षटकात ७ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. शिखरने २१ चौकार आणि १ षटकारासह १५३ धावांची खेळी साकारली. त्याला ध्रुव शौरीने ६१ धावा काढत चांगली साथ दिली. कर्णधार प्रदिप सांगवान (७) आणि ललित यादव (१८) यांनी नाबाद राहत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा - Vijay Hazare Trophy : मुंबईचा विजयी चौकार, श्रेयस अय्यरचे शतक
हेही वाचा - भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका महाराष्ट्रात होणार, ठाकरे सरकारचा हिरवा कंदिल