जोहान्सबर्ग - सलामीवीर फलंदाज डीन एल्गारने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा नवा कसोटी कर्णधार होण्यात रस दर्शवला आहे. एल्गार म्हणाला, ''मी नेतृत्व करण्यास तयार आहे. ही जबाबदारी मला मिळाली तर त्याचा मी गांभीर्याने विचार करेन.'' फाफ डुप्लेसिसने फेब्रुवारी महिन्यात कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
एल्गारने सीएसएला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, "कसोटी कर्णधारपद निश्चितपणे सोपे नसले तरी मला वाटले की माझ्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. शाळेपासून प्रांतीय पातळीवरील संघ आणि फ्रेंचायझी स्तरापर्यंत मी यापूर्वीही कर्णधारपदी काम केले आहे. ही जबाबदारी मला मिळाली तर मला खूप आनंद होईल आणि त्याचा मी गांभीर्याने विचार करेन.''
डुप्लेसिसनंतर कर्णधारपदासाठी क्विंटन डी कॉकच्या नावाची चर्चा होती. मात्र, मंडळाने त्याच्यावरील अतिरिक्त भार न वाढवण्याचे सांगून कर्णधारपदाच्या शर्यतीतून वगळले आहे. जुलैमध्ये आफ्रिका संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची असून मंडळ अद्याप कसोटी कर्णधाराच्या शोधात आहे.