ETV Bharat / sports

DC vs CSK : पंतने केली पाँटिंग नक्कल, व्हिडीओ वायरल - रिकी पाँटिंग न्यूज

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर यांच्यातील सामना रंगतदार झाला. या सामन्यात एक मजेशीर घटनाही पाहायला मिळाली. ऋषभ पंत या सामन्यात प्रशिक्षक रिकी पाँटिंगची नक्कल करताना पाहायला मिळाले.

DC vs CSK: Rishabh Pant pranks Ricky Ponting, Indian and South African teammates hug each other
DC vs CSK: पंतने केली पाँटिंग नक्कल, व्हिडीओ वायरल
author img

By

Published : Oct 18, 2020, 5:09 PM IST

शारजाह - दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर यांच्यातील सामना रंगतदार झाला. या सामन्यात एक मजेशीर घटनाही पाहायला मिळाली. ऋषभ पंत या सामन्यात प्रशिक्षक रिकी पाँटिंगची नक्कल करताना पाहायला मिळाला.

घडलं असं की, रिकी पाँटिग सामना चालू असताना मुलाखत देत होता. त्यावेळी पंत पाँटिगच्या मागे उभा राहून पाँटिंगची नक्कल करत होता. ही बाब पाँटिंगच्या लक्षात आली, तेव्हा तो देखील हसू लागला. याचा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याच सामन्यादरम्यान, फाफ डू प्लेसिस आणि कागिसो रबाडा यांची एकमेकांना धडक झाली. यानंतर दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. हा क्षण देखील मजेशीर होता. तर, ऋषभ पंतला दुखापत झाली आहे. यामुळे तो काही आठवडे खेळू शकणार नाही.

शारजाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव केला. विजयासाठी चेन्नईने दिलेले १८० धावांचे आव्हान दिल्लीने शिखर धवनच्या शतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केले. अखेरपर्यंत मैदानावर टिकून राहत शिखरने नाबाद १०१ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती आणि मैदानावर धवन व अक्षर पटेल ही जोडी होती. अक्षर पटेलने यावेळी जडेजाच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी करत ३ षटकार लगावत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा - ई-सिगारेट पिताना आढळला बंगळुरूचा स्टार फलंदाज... पाहा व्हिडिओ

हेही वाचा - आयपीएल २०२० : गुणतालिकेत 'वरचढ' होण्यासाठी कोलकाता-हैदराबाद भिडणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.