ETV Bharat / sports

ना  विराट  ना रोहित, तर 'हा' आहे जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज - no 1 batsman in icc t20 ranking

३३ वर्षीय मलान आधी पाचव्या स्थानावर होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १२९ धावा केल्या. मलानने आतापर्यंत १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ४८.७१च्या सरासरीने ६८२ धावा केल्या आहेत. यात एक नाबाद शतकाचाही समावेश आहे. जेसन रॉय आणि बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत मलानला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळण्याची संधी मिळाली.

Dawid malan jumped from number five to number one in icc t20 ranking
विराट नव्हे, रोहित नव्हे तर 'हा' आहे जगातील प्रथम क्रमांकांचा फलंदाज
author img

By

Published : Sep 9, 2020, 4:50 PM IST

साउथम्प्टन - बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी टी-२० क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानने अव्वल स्थान मिळवले आहे. त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत ही कामगिरी केली. मलानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेमध्ये शानदार पदार्पण केले होते.

  • 👏 Dawid Malan moves to No.1
    ↗️ Adil Rashid makes further gains
    ☝️ Kane Richardson the lone fast bowler in the top 10

    Details from the latest @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings ⬇️ https://t.co/Rx5PiKy6NG

    — ICC (@ICC) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

३३ वर्षीय मलान याआधी पाचव्या स्थानावर होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १२९ धावा केल्या. मलानने आतापर्यंत १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ४८.७१च्या सरासरीने ६८२ धावा केल्या आहेत. यात एका नाबाद शतकाचाही समावेश आहे. जेसन रॉय आणि बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत मलानला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळण्याची संधी मिळाली.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी मालिकावीर पुरस्कार मिळालेल्या जोस बटलरने या नव्या क्रमवारीत २८वे स्थान मिळवले आहे. त्याने या मालिकेत १२१ धावा ठोकल्या. बटलरचा संघातील सहकारी जॉनी बेअरस्टोने १९वे स्थान मिळवले आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंच तिसर्‍या तर ग्लेन मॅक्सवेल सहाव्या क्रमांकावर आहे. भारताचा लोकेश राहुल चौथ्या आणि विराट कोहली नवव्या स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीदने सातवे स्थान मिळवले असून एश्टन अगरने तिसरे स्थान राखले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.