दुबई - आयसीसीने टी-२० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. यात इंग्लंडचा फलंदाज डेविड मलानने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे सारत अव्वलस्थान काबिज केले आहे. मलान टी-२० क्रमवारीत सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे.
आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर आझम पहिल्या स्थानावर होता. त्याला मलानने धक्का दिला आणि पहिले स्थान काबिज केले. मलान ८७७ रेटींग पॉईंटस पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर बाबर आझम ८६९ रेटींग पॉईंटस दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
-
🎉 Dawid Malan rises to No.1 🎉
— ICC (@ICC) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The England batsman, who topped the run-scoring charts in the #ENGvAUS series, has jumped four places on the @MRFWorldwide ICC Men's T20I Rankings 🔥 pic.twitter.com/rLvECHFigb
">🎉 Dawid Malan rises to No.1 🎉
— ICC (@ICC) September 9, 2020
The England batsman, who topped the run-scoring charts in the #ENGvAUS series, has jumped four places on the @MRFWorldwide ICC Men's T20I Rankings 🔥 pic.twitter.com/rLvECHFigb🎉 Dawid Malan rises to No.1 🎉
— ICC (@ICC) September 9, 2020
The England batsman, who topped the run-scoring charts in the #ENGvAUS series, has jumped four places on the @MRFWorldwide ICC Men's T20I Rankings 🔥 pic.twitter.com/rLvECHFigb
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणाऱ्या मलानने आतापर्यंत फक्त १६ आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. यात त्याने ४८.७१ च्या सरासरीने ६८२ धावा केल्या आहेत. यात एक शतकाचा समावेश आहे.
मलानला जेसन रॉय आणि बेन स्टोक्स यांच्या अनुपस्थितीत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. दरम्यान, जवळपास ५० च्या सरासरीने धावा करुनही मलानची जागा अद्याप संघात फिक्स नाही.
आयसीसी टी-२० क्रमवारीत टॉप-१० मध्ये भारताचे दोन खेळाडू आहेत. केएल राहुल ८२४ तर कर्णधार विराट कोहली ६७२ रेटींग पॉईंटस अनुक्रमे चौथ्या आणि नवव्या क्रमाकांवर आहेत. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा टॉप-१० बाहेर आहे.
हेही वाचा - अखेरच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर मात, क्रमवारीत पटकावले अव्वलस्थान
हेही वाचा - पिक्चर अभी बाकी है..! रोहितने सरावादरम्यान मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर; पाहा व्हिडिओ