मुंबई - ऑस्ट्रेलियाचा डावखुरा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. तो त्याची पत्नी कँडी आणि मुलींसह टिकटॉक व्हिडिओ शूट करून शेअर करत आहे. काही तासांपूर्वीच वॉर्नरने पत्नी कँडीसोबत, दाक्षिणात्य स्टार अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डान्स करताना व्हिडिओ शेअर केला. वॉर्नरच्या या व्हिडिओचं कौतुक खुद्द अल्लू अर्जुनने केले शिवाय त्याने वॉर्नरचे आभारही मानले.
-
Thank you very much. Really Appreciate it . 👍🏼🙏🏼 https://t.co/mPJrlhhkxf
— Allu Arjun (@alluarjun) April 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you very much. Really Appreciate it . 👍🏼🙏🏼 https://t.co/mPJrlhhkxf
— Allu Arjun (@alluarjun) April 30, 2020Thank you very much. Really Appreciate it . 👍🏼🙏🏼 https://t.co/mPJrlhhkxf
— Allu Arjun (@alluarjun) April 30, 2020
डेव्हिड वॉर्नरचा टिकटॉक व्हिडिओ इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) सनरायझर्स हैदराबाद संघाने शेअर केला होता. वॉर्नर सनरायझर्स संघाचा कर्णधार आहे. या व्हिडिओत वॉर्नर आणि त्याची पत्नी कँडी 'बोटा बोम्बा' या तेलुगू गाण्यावर नाचताना दिसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे तो डान्स सुरू असताना वॉर्नरची लेक फ्रेममध्ये आली आणि तिनेदेखील डान्स करायला सुरूवात केली. हे गाणं अल्लू अर्जूनच्या 'अला वैकुंठपुरामलू' या चित्रपटातील आहे.
- View this post on Instagram
It’s tiktok time #buttabomma get out of your comfort zone people lol @candywarner1
">
दरम्यान, वॉर्नरने टिकटॉकवर काही दिवसांपूर्वीच पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत १४ व्हिडिओ अपलोड केले आहेत. पण त्याचे तब्बल १९ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
हेही वाचा - HBD Rohit : रोहितने गुडघ्यावर बसून रिंग देत रितिकाला केलं प्रपोज, वाचा हिटमॅनची बॉलिवूड स्टाईल लवस्टोरी