नवी दिल्ली - बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या क्रिकेट संघासाठी नवीन प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि आयपीएलच्या दिल्ली आणि बंगळूरू संघाकडून खेळलेला डॅनियल व्हेट्टोरी आता बांगलादेशच्या फिरकीपटूंना प्रशिक्षण देणार आहे.
व्हेट्टोरीसोबत दक्षिण आफ्रिकेचा चार्ल लँगवेल्टचीही बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी या निवडीबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, 'व्हेट्टोरीसोबत करार अजून व्हायचा आहे पण, त्याने या नियुक्तीबद्दल होकार दिला आहे. आणि लँगवेल्टकडूनही आम्हाला होकार आला आहे.'

डॅनियल व्हेट्टोरी बांगलादेशसाठी १०० दिवस प्रशिक्षक म्हणून काम करेल. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वकरंकासाठीही तो प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे. २०१५ मध्ये व्हेट्टोरी निवृत्त झाला होता. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये बंगळूरू संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.
दक्षिण आफ्रिकेच्या चार्ल लँगवेल्टने सहा कसोटी तर ७२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यानंतर २०१५ ते २०१७ पर्यंत त्याने आफ्रिकेचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.