मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी काही दिवसांचा कालावधीच शिल्लक राहिला आहे. या हंगामाची तयारी पंजाब किंग्ज संघाने जोरात सुरू केली आहे. पंजाबने ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज डेमिन राइट यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमले आहे.
पंजाब किंग्ज संघाने राइट यांचे स्वागत ट्विटच्या माध्यमातून केलं आहे. राइट यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि बांगलादेश या देशाच्या संघाना प्रशिक्षण दिलं आहे. ४५ वर्षीय राइट दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज चार्ल्स लॅगवेल्ट यांची जागा घेतील.
-
Wright has come to the right place ☑️😅
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Another Aussie on-board! 😍#SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/W4rSjP25VU
">Wright has come to the right place ☑️😅
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 12, 2021
Another Aussie on-board! 😍#SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/W4rSjP25VUWright has come to the right place ☑️😅
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 12, 2021
Another Aussie on-board! 😍#SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/W4rSjP25VU
राइट यांच्या समावेशामुळे पंजाब संघाची प्रशिक्षकांची फळी तगडी झाली आहे. अनिल कुंबळे पंजाब संघाचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय अॅन्डी फ्लावर, जॉन्टी रोड्स, वसीम जाफर हे देखील प्रशिक्षकांच्या टीममध्ये आहेत.
डेमिन राइट यांनी १२३ प्रथम श्रेणी सामने खेळी आहेत. त्यांनी २०११ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. बिग बॅश लीगमध्ये त्यांनी होबार्ट हॅरीकेन आणि मेलबर्न स्टार या संघांना प्रशिक्षण दिलं आहे.
हेही वाचा - IND vs ENG: पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा दारुण पराभव; इंग्लंडची आघाडी
हेही वाचा - IND VS ENG : पराभवानंतर सहकाऱ्यांवर भडकला विराट, म्हणाला.. आता चूकीला माफी नाही