किंग्स्टन - कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे आमच्या क्रिकेट असोसिएशनवर वाईट परिणाम झाला असून या साथीने क्रिकेट संघटनेला आयसीयूत ढकलले, असे क्रिकेट वेस्ट इंडीजचे (सीडब्ल्यूआय) प्रमुख स्किरिट म्हणाले आहेत. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी बरीच कपात करावी लागणार असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.
एका मुलाखतीत स्किरिट म्हणाले, “आधीच संकटात असलेल्या आमच्या क्रिकेट मंडळाला कोरोनाने आयसीयूमध्ये ढकलले आहे. तुम्ही डॉक्टरांकडे उपचारासाठी गेलात आणि त्यापूर्वीच तुम्हाला ह्रदयविकाराचा झटका आला. अशी परिस्थिती सध्याची आहे”
ते पुढे म्हणाले, “एक समिती स्थापन केली गेली आहे, जी दौरे आणि मालिका रद्द करण्याच्या आर्थिक परिणामांचा आढावा घेऊन आपला अहवाल देईल. येत्या २७ मे रोजी होणाऱया बैठकीत हा अहवाल सादर केला जाईल.