मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून, नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत आहेत. अशातच भारताच्या आजी-माजी खेळाडूंनी तर याबाबत एक धम्माल गाणं तयार केलं आहे. या गाण्याचे बोल 'डोन्ट यू वरी, बस ना घरी...' असे आहे. सद्या हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
डोन्ट यू वरी, बस ना घरी... या गाण्यात श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, वसिम जाफर, साईराज बहुतुले, जेमिमा रॉड्रिक्स अशा प्रसिद्ध आजी-माजी क्रिकेटपटूंचा सहभाग आहे. तर या गाण्याचे लेखन, संकल्पना, संगीत आणि दिग्दर्शन, प्रसिद्ध निर्माता, संगीतकार अभिजीत कवठाळकर आणि डॉ. ज्योत्सना चित्रोडा यांनी केलं आहे.
या गाण्याचा व्हिडिओ श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, वसिम जाफर, साईराज बहुतुले, जेमिमा रॉड्रिक्स, चंद्रकांत पंडित, सिद्धेश लाड, पारस म्हांब्रे, बलविंदरसिंग संधू, मोमा मेश्राम, राहुल त्रिपाठी, शंतनू सुगवेकर, इक्लाब सिद्दिकी, धीरज जाधव या क्रिकेटपटूंनी आपापल्या घरीच राहून चित्रीत केला आहे. महत्वाची बाब म्हणजे, कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्यासाठी अनेक व्हिडिओ आतापर्यंत आले आहेत. पण आजी-माजी क्रिकेटपटूंचा समावेश असलेला हा पहिलाच व्हिडिओ आहे.
हेही वाचा - VIDEO : हिटमॅनकडून अनोख्या पद्धतीत 'चॅलेंज' पूर्ण
हेही वाचा - दुसऱ्यांच्या मदतीवर जगणाऱ्या देशासाठी काहीतरी कर अन् काश्मीरचा नाद सोड, रैनाने आफ्रिदीला सुनावलं