मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता भारतीय संघातील माजी खेळाडू युसूफ पठाणलाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. स्वतः युसूफने शनिवारी (दि. 27) रात्री साडेआठ वाजता ट्विट करून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंतीही त्याने ट्विटद्वारे केली आहे.
सचिन तेंडुलकरला शनिवारी दुपारी कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर रात्री युसूफने त्यालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे मी घरातच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मी आवश्यक ती सर्व खबदरदारी आणि औषध घेतली आहे', असे युसूफने म्हटले आहे. त्या अगोदर सचिनने देखील ट्विट करूनच कोरोना झाल्याची माहिती दिली होती.
हेही वाचा - टीव्ही अभिनेत्री ट्रोल का होतात, तापसी पन्नूचा खोचक सवाल