नवी दिल्ली - क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक खुषखबर आहे. 2028 मध्ये लॉस एन्जेल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. मेरीलबॉर्न क्रिकेट क्लबचे (MCC) चेअरमन माईक गॅटिंग यांनी यासंबंधी माहिती दिली.
गॅटिंग यांनी एका मीडियासंस्थेला माहिती दिली. ते म्हणाले, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) 2028 मध्ये लॉस एन्जेल्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळामध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय, या प्रकरणी जोरदार काम सुरु असुन क्रिकेटसाठी ही खुप मोठी गोष्ट असणार आहे.'
गॅटींग पुढे म्हणाले, 'संपूर्ण महिन्यासाठी नव्हे तर केवळ दोन आठवड्यांचा विचार केला जाईल. त्यामुळे जास्त त्रास होणार नाही.' २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात त्याची पुष्टी होईल, असे गॅटिंग यांनी आधी सांगितले होते.
-
Women’s T20 Cricket has been confirmed for inclusion at the Birmingham 2022 Commonwealth Games 👏 pic.twitter.com/2rTfeZ0tKn
— ICC (@ICC) August 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Women’s T20 Cricket has been confirmed for inclusion at the Birmingham 2022 Commonwealth Games 👏 pic.twitter.com/2rTfeZ0tKn
— ICC (@ICC) August 13, 2019Women’s T20 Cricket has been confirmed for inclusion at the Birmingham 2022 Commonwealth Games 👏 pic.twitter.com/2rTfeZ0tKn
— ICC (@ICC) August 13, 2019