मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. भारतीय फलंदाज सुरेश रैनानेही मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मोदींच्या घोषणेनंतर सुरेश रैनाने ट्विट करुन मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तो म्हणतो, 'कोरोना विषाणू विरोधातील लढा आपल्याला जिंकायचे आहे. चला, वाढीव लॉकडाउनपर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत आपण घरात राहून साऱ्यांना सुरक्षित ठेवूया. तसेच पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेले आरोग्यसेतु अॅपदेखील डाउनलोड करूया. या अॅपचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. मी हे अॅप आधीच घेतले आहे. तुम्हीही घ्या. यामुळे आपण सुरक्षित राहू.'
-
We have to win this fight against #COVID19.Lets follow #Lockdown2 till May 3. I request all to follow @narendramodi ji’s advise to download #AarogyaSetu app.I already have. It will protect us all. Download from here iOS:https://t.co/cqkp63nDFJ
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) April 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Android:https://t.co/dLBnGSQlD1
">We have to win this fight against #COVID19.Lets follow #Lockdown2 till May 3. I request all to follow @narendramodi ji’s advise to download #AarogyaSetu app.I already have. It will protect us all. Download from here iOS:https://t.co/cqkp63nDFJ
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) April 14, 2020
Android:https://t.co/dLBnGSQlD1We have to win this fight against #COVID19.Lets follow #Lockdown2 till May 3. I request all to follow @narendramodi ji’s advise to download #AarogyaSetu app.I already have. It will protect us all. Download from here iOS:https://t.co/cqkp63nDFJ
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) April 14, 2020
Android:https://t.co/dLBnGSQlD1
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २४ मार्च रोजी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. हा लॉकडाऊन आज संपणार होता. पण मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना कोरोनाचा अजूनही पूर्णपणे खात्मा शक्य झाला नसल्याने हा लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली.
दरम्यान, मोदींच्या लॉकाडाऊन वाढवण्याच्या निर्णयामुळे आयपीएलचे काय होणार अशी चर्चा रंगली. तेव्हा बीसीसीआयच्या सूत्रांनी, यंदाच्या हंगामातली आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे आयपीएल २०२० चे काय होणार ?
हेही वाचा -IPL अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली, BCCI सूत्रांची माहिती