ETV Bharat / sports

Covid-१९ : युवराजने मोठी रक्कम दान देत ट्रोलर्सची केली बोलती बंद

युवराजने त्यांच्या ट्विटमध्ये सांगितलं की, 'मी आज रात्री ९ वाजता ९ मिनिटासाठी मेणबत्ती पेटवणार आहे. काय तुम्ही माझ्यासोबत आहात का? एकजूटतेच्या दिवशी मी पंतप्रधान सहायता निधीसाठी ५० लाख रुपयांचे दान देत आहे. तुम्हीही आपापल्या परीने मदत करा.'

Covid-19 outbreak: Yuvraj Singh donates Rs 50 lakhs
Covid-१९ : युवराजने मोठी रक्कम दान देत ट्रोलर्संची केली बोलती बंद
author img

By

Published : Apr 5, 2020, 8:21 PM IST

मुंबई - भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने कोरोना लढ्यासाठी मोठी मदत दिली आहे. त्याने पंतप्रधान सहायता निधीला, ५० लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. युवीने ही माहिती त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन दिली. यासोबत त्याने, आज रात्री ९ वाजता ९ मिनिटासाठी मेणबत्ती पेटवून एकता दाखवण्याचे आवाहन केले आहे.

युवराजने या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'मी आज रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी मेणबत्ती पेटवणार आहे. काय तुम्ही माझ्यासोबत आहात का? आजच्या दिवशी मी पंतप्रधान सहायता निधीसाठी ५० लाख रुपयांचे दान देत आहे. तुम्हीही आपापल्या परीने मदत करा.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.५ एप्रिल) रात्री नऊ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विजेची उपकरणे बंद करा आणि दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईलचा फ्लॅश ऑन करा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन देशवाशियांना केले आहे. युवराजने मोदींच्या आवाहनाला पाठिंबा देत याबाबत चाहत्याला आवाहन केले आहे.

दरम्यान, युवराज याआधी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतलेल्या पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीला पाठिंबा दिल्याने ट्रोल झाला होता. युवराज आणि हरभजन यांनी आफ्रिदीच्या कामाला पाठिंबा देत त्याला मदतीचे आवाहन केले होते. पण ही गोष्ट भारतीय नेटकऱ्यांना आवडली नाही. तेव्हा त्यांनी दोघांना ट्रोल केले.

यानंतर युवीने, मला हे कळत नाही की मी जो मॅसेज केला होता, तो गरजूंना मदत मिळावी यासाठी होता. त्याला चुकीच्या पद्धतीने घेण्यात येत आहे. माझा हेतू कोणाच्या भावना दुखवायचा नव्हता. कोरोनामुळे पीडित असलेल्या गरजूंना मदत मिळो, हाच हेतू माझा होता. मी एक भारतीय आहे आणि मी नेहमी मानवतेसाठी उभा राहीन, असे म्हणत त्याने ट्रोलर्सचा समाचार घेतला होता.

हेही वाचा - धोनीने आजच्याच दिवशी पाकला धूतलं होतं, 'ती' खेळी आजही चाहत्यांच्या आठवणीत

हेही वाचा - “वर्ल्डकप फायनलमध्ये मी धोनीला वर फलंदाजी करण्यास सांगितले होते”

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.