ETV Bharat / sports

'त्याची' मदत पाहून वृद्ध महिलेच्या डोळ्यात आलं पाणी, हरभजनने शेअर केला VIDEO - हरभजन सिंगने शेअर केला वुद्ध महिलेला मदत करतानाचा व्हिडिओ

हरभजन याने शेअर केलेल्या व्हिडिओत, एका वृद्ध महिलेच्या घरात जाऊन शीख व्यक्ती तिला साहित्य देतो. त्याची मदत पाहून वृद्ध महिलेच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. तेव्हा तो शीख व्यक्ती, 'रोना नही माताजी', असे म्हणतो आणि त्यानंतर तो महिलेला पैशांची मदतही देऊ करतो आणि तिथून निघून जातो.

covid 19 lockdown harbhajan singh tweets video man help to old women
'त्याची' मदत पाहून वृद्ध महिलेच्या डोळ्यात आलं पाणी, हरभजनने शेअर केला VIDEO
author img

By

Published : Apr 4, 2020, 12:50 PM IST

मुंबई - कोरोनामुळे संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे दुर्बल घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये गरजूंच्या मदतीसाठी, सर्व स्तरातील अनेक लोकं पुढे येत आहेत. असाच एक मदतीचा व्हिडिओ भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगने शेअर केला आहे. यात एक शीख बांधव वृद्ध महिलेला मदत करताना पाहायला मिळत आहे.

हरभजन याने शेअर केलेल्या व्हिडिओत, एका वृद्ध महिलेच्या घरात जाऊन शिख व्यक्ती तिला साहित्य देतो. त्याची मदत पाहून वृद्ध महिलेच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. तेव्हा तो शीख व्यक्ती, 'रोना नही माताजी', असे म्हणतो आणि त्यानंतर तो महिलेला पैशांची मदतही देऊ करतो आणि तिथून निघून जातो.

  • Jeonda reh mere veer.. Dua hai waheguru agge aise nek bandhe jeondhe wasdhe rehen.. Dhan guru Nanak Meher kari sab te.. ❤️❤️🙏🙏 together we can win this war against corona virus #carona #humainty #respect 🙏🙏rab de bandhe 🙏 pic.twitter.com/BnDFHJ7DZS

    — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान हरभजनने हा व्हिडिओ शेअर करत, मदत करणारा व्यक्ती देवदूतच आहेत, अशा शब्दात त्या व्यक्तीचे कौतूक केले आहे. याशिवाय त्याने, आपण सर्वजण मिळून कोरोनाशी लढा देऊ शकतो, असा विश्वास बोलून दाखवला आहे.

काही दिवसांपूर्वी, हरभजन सिंग आणि युवराज सिंह यांनी कोरोना पीडितासाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला पाठिंबा दिला होता. त्यांनी आफ्रिदीला या कामात मदत करा, असे आवाहन केले होते. यानंतर भारतीय चाहत्यांनी दोघांना ट्रोल केले होते.

हेही वाचा - 'आधी फिंच-एबी आणि विराटला बाद करा, मग मला बॉलिंग करण्याची स्वप्न पाहा'

हेही वाचा -पाकचा बुमराहला ट्रोल करण्याचा प्रयत्न, भारतीय चाहत्यांनी घेतला समाचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.