जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा माजी स्फोटक फलंदाज हर्षेल गिब्जने कोरोना व्हायरसविरूद्ध सुरू असलेल्या युद्धात मदत करण्यासाठी आपल्या बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या बॅटने त्याने 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 175 धावांची विस्फोटक खेळी खेळली होती. गिब्जच्या खेळीच्या जोरावर आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी 438 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता.
46 वर्षीय गिब्जने 14 वर्षांपूर्वी 12 मार्च 2006 रोजी विक्रम खेळी खेळली होती. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने एक चेंडू आणि एक विकेट शिल्लक असताना विजय साकारला होता.
''वर्षानुवर्षे सांभाळून ठेवलेल्या या बॅटचा मी कोरोना निधीसाठी लिलाव करणार आहे'', असे गिब्जने ट्विटरवर म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे तत्कालिन प्रशिक्षक असलेल्या मिकी आर्थर यांनी ट्विट करून गिब्सच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
-
Supersport showing the #438 game . The bat i used that day will be up for auction to raise funds for covid. Kept it all these years. pic.twitter.com/VyGyAzKVSn
— Herschelle Gibbs (@hershybru) May 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Supersport showing the #438 game . The bat i used that day will be up for auction to raise funds for covid. Kept it all these years. pic.twitter.com/VyGyAzKVSn
— Herschelle Gibbs (@hershybru) May 1, 2020Supersport showing the #438 game . The bat i used that day will be up for auction to raise funds for covid. Kept it all these years. pic.twitter.com/VyGyAzKVSn
— Herschelle Gibbs (@hershybru) May 1, 2020