मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या लॉकडाऊन दरम्यान कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. धोनी आयपीएल २०२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. पण, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आयपीएलवर अनिश्चिततेचे सावट आहे. यामुळे धोनीचे क्रिकेटमध्ये पुनरागमन लांबणीवर पडले आहे.
दरम्यान, आयपीएलमध्ये धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो लॉनची साफसफाई करताना दिसत आहे.
-
Lawn time, no see!#Thala #WhistlePodu 🦁💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
PC: @SaakshiSRawat pic.twitter.com/UsWbkU6k0E
">Lawn time, no see!#Thala #WhistlePodu 🦁💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 9, 2020
PC: @SaakshiSRawat pic.twitter.com/UsWbkU6k0ELawn time, no see!#Thala #WhistlePodu 🦁💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 9, 2020
PC: @SaakshiSRawat pic.twitter.com/UsWbkU6k0E
इंग्लंडमध्ये पार पडलेल्या २०१९ विश्वकरंडक स्पर्धेतील भारतीय संघाच्या पराभवानंतर धोनी संघाबाहेर आहे. या सामन्यानंतर धोनीने आजघडीपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनेकदा धोनीच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत असते, मात्र धोनीने अद्याप अधिकृतपणे कोणतीही गोष्ट जाहीर केली नाही.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ ला टी-२० विश्वकरंडक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तिन्ही महत्वाच्या स्पर्धांचं विजेतेपद पटकावले आहे. धोनीने आतापर्यंत ३५० सामन्यामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले असून श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.