ETV Bharat / sports

Video : अशी ही मदत ! मी आर्थिक मदत करू शकत नाही, पण दोन एकरातील केळी गरजूंना देतो

अजिंक्यने उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ, त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. यात तो शेतकरी, कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ येत आहे. मी गरीब शेतकरी असून आर्थिक मदत करु शकत नाही. पण मी माझी केळीचे पीक याकामी देऊ इच्छितो, असे सांगताना दिसून येत आहे.

coronavirus : ajinkya rahane sharare tuljapur farmer video
Video : कोरोना लढ्यासाठी शेतकऱ्यानं दोन एकरातील केळी दिली दान, अजिंक्यने केला 'सॅल्यूट'
author img

By

Published : Apr 6, 2020, 1:02 PM IST

मुंबई - कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला सर्वस्तरातून प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान, भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने एका शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या शेतकऱ्याने देवू केलेली मदत सर्वांच्याच कौतूकाचा विषय ठरली आहे.

अजिंक्यने उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ, त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. यात तो शेतकरी, कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ येत आहे. मी गरीब शेतकरी असून आर्थिक मदत करु शकत नाही. पण मी माझी केळीचे पीक याकामी देऊ इच्छितो, असे सांगताना दिसून येत आहे.

  • It’s not about what you have, it’s about what you give!
    A noble gesture by this farmer from Tuljapur who is willing to offer his produce to the needy during this difficult period. #IndiaFightsCorona
    pic.twitter.com/k5Une4tbKE

    — Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) April 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अजिंक्यने त्या शेतकरीच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे. तो म्हणतो, 'तुमच्याकडे किती आहे यापेक्षा तुम्ही किती देता, हे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या संकट काळात तुळजापूरच्या शेतकऱ्याच्या या पुढाकाराचे कौतुक.'

  • तो शेतकरी काय म्हणतो....

देशच नाही तर संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. या परिस्थितीचा सामना अख्खं जग आणि आपला देश चांगल्या पद्धतीने करत आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार आपल्याला घरीच राहण्याची कळकळीची विनंती करत आहेत. त्यांची विनंती योग्य आहे. पण यामुळे गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मी शेतकरी आहे आणि मी आर्थिक मदत करू शकत नाही. पण, माझी दोन एकर केळीची शेती असून सद्या केळी काढणीला आली आहेत. ती केळी मी गरजूंना देऊ इच्छितो. शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी ही केळी घेऊन जावी आणि ते गरिबांपर्यंत पोहोचवावी.

दरम्यान, याआधी अजिंक्यने कोरोना लढ्यासाठी मदत देऊ केली आहे. त्याने मुख्यमंत्री सहायता निधीत १० लाखांचे दान दिले आहे.

Corona virus : रोहित शर्मा विश्व कप आणखी दूर असं का म्हणाला, वाचा

मोदींचं 'दिवा' अभियान : अजिंक्य म्हणतोय, 'हे दिवसही जातील !'

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.