ETV Bharat / sports

८६७ षटकानंतर फेकला पहिला 'नो बॉल', अन्...वाचा कोण आहे कमनशिबी गोलंदाज - chris woakes 1st no ball

अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यात, ख्रिस वोक्सने आपल्या कसोटी कारकिर्दीत ८६७ षटकानंतर पहिला नो बॉल टाकला. होय, तब्बल ५२०० चेंडूनंतर पहिला नो बॉल. ख्रिसच्या त्या बॉलवर फलंदाज बाद झाला. मैदानातील पंचाना तो चेंडू नो बॉल असल्याचे कळले नाही. तेव्हा तिसऱ्या पंचानी ती चूक मैदानावरिल पंचांना सांगितली. तेव्हा तो चेंडू नो बॉल देण्यात आला.

८६७ षटकानंतर फेकला पहिला 'नो बॉल', अन्...वाचा कोण आहे कमनशिबी गोलंदाज
author img

By

Published : Sep 16, 2019, 8:54 PM IST

लंडन - नुकतीच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील प्रतिष्ठित अॅशेस मालिका संपली आहे. अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने १३५ धावांनी विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडली. दरम्यान, ही मालिका गाजली ती स्टीव्ह स्मिथ आणि अष्टपैलू कामगिरी करणारा बेन स्टोक्समुळे. स्टीव्ह स्मिथने मालिकेत ७७४ धावा चोपल्या तर बेन स्टोक्सने अशक्य वाटणारा अविश्वसणीय सामना जिंकून दाखवला. दरम्यान, ही मालिका आणखी एका वेगळ्या विषयावरुन गाजली.

अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यात, ख्रिस वोक्सने आपल्या कसोटी कारकिर्दीत ८६७ षटकानंतर पहिला नो बॉल टाकला. होय, तब्बल ५२०० चेंडूनंतर पहिला नो बॉल. ख्रिसच्या त्या बॉलवर फलंदाज बाद झाला. मैदानातील पंचाना तो चेंडू नो बॉल असल्याचे कळले नाही. तेव्हा तिसऱ्या पंचानी ती चूक मैदानावरिल पंचांना सांगितली. तेव्हा तो चेंडू नो बॉल देण्यात आला.

हेही वाचा - टी-20 क्रिकेटमधे नवीन करिश्मा; 'या' दोन फलंदाजांनी सलग 7 चेंडूत ठोकले 7 षटकार

घडलं काय ?
मिचेल मार्श मैदानात असताना ३१ व्या षटकादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स गोलंदाजी करत होता. वोक्सच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना मार्शच्या बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षक बुर्नच्या ग्लोव्हजमध्ये विसावला.

मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले, मात्र तिसऱ्या पंचांनी टीव्ही रिप्लेमध्ये पाहिले आणि तो चेंडू नो बॉल असल्याचे त्यांना दिसले. यामुळे मार्शला नाबाद ठरवण्यात आले. ८६७ षटकानंतर पहिला नो बॉल टाकणाऱ्या वोक्सला याचा फटका बसला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.