पोर्ट ऑफ स्पेन - टीम इंडिया आणि विंडीजविरुद्धच्या झालेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने बाजी मारली. कर्णधार विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर भारताने वेस्टइंडिजवर 6 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने क्रिकेटच्या देवालाच मागे टाकले आहे.
आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीर फलंदाजामध्ये गेल हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने या विक्रमामध्ये सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. सलामीवीर म्हणून गेलने १०१०७ तर सचिनने सलामीवीर म्हणून ९२६१ धावा केल्या आहेत. आधीच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या गेलने शेवटच्या सामन्यात मात्र भारतीय गोलंदाजांची धुलाई केली.
-
🌴v 🇮🇳#UniverseBossFacts @henrygayle has the most runs as an opener in ODI cricket & is the only West Indian in the top 10.
— Windies Cricket (@windiescricket) August 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Chris Gayle player profile
⬇️⬇️⬇️⬇️⬇️https://t.co/03Qh37VFPJ#WIvIND #MenInMaroon #ItsOurGame pic.twitter.com/GJm14XW7TH
">🌴v 🇮🇳#UniverseBossFacts @henrygayle has the most runs as an opener in ODI cricket & is the only West Indian in the top 10.
— Windies Cricket (@windiescricket) August 14, 2019
Chris Gayle player profile
⬇️⬇️⬇️⬇️⬇️https://t.co/03Qh37VFPJ#WIvIND #MenInMaroon #ItsOurGame pic.twitter.com/GJm14XW7TH🌴v 🇮🇳#UniverseBossFacts @henrygayle has the most runs as an opener in ODI cricket & is the only West Indian in the top 10.
— Windies Cricket (@windiescricket) August 14, 2019
Chris Gayle player profile
⬇️⬇️⬇️⬇️⬇️https://t.co/03Qh37VFPJ#WIvIND #MenInMaroon #ItsOurGame pic.twitter.com/GJm14XW7TH
शेवटच्या एकदिवसीय सामन्यात गेलने स्फोटक फलंदाजीचे दर्शन घडवले. गेलने ४१ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ७२ धावा केल्या. वेस्टइंडीजतर्फे सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईसने शतकी भागीदारी करत विंडीजला आश्वासक सुरुवात करुन दिली. यानंतर पावसाने सामन्यात हजेरी लावल्यामुळे बराच वेळ वाया गेला. पाऊस थांबल्यानंतर अखेरीस १५ षटकांचा खेळ कमी करण्यात आला. भारताने ही ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० च्या फरकाने जिंकली आहे.