अहमदाबाद - भारतीय कसोटी संघाचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराची मुलगी आदिती हिचा वाढदिवस, भारतीय खेळाडू आणि त्यांच्या परिवाराच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पांड्या यांची मुलं देखील आदितीला शुभेच्छा देण्यासाठी जमले होते. रोहितची मुलगी समायरा हिने खास अंदाजात आदितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
Pujara's daughter 'adithi' birthday celebration 💕😍 pic.twitter.com/tPH0LMimuh
— kavana 💜 (@KLRxoxoo) February 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pujara's daughter 'adithi' birthday celebration 💕😍 pic.twitter.com/tPH0LMimuh
— kavana 💜 (@KLRxoxoo) February 22, 2021Pujara's daughter 'adithi' birthday celebration 💕😍 pic.twitter.com/tPH0LMimuh
— kavana 💜 (@KLRxoxoo) February 22, 2021
मुंबई इंडियन्स संघाने आदितीच्या बर्थडे पार्टीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात समायरा हातात माइक घेत आदितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघातील खेळाडूंना आपल्या परिवाराला सोबत ठेवण्याची परवानगी आहे. यामुळे खेळाडू आपल्या परिवारासह अहमदाबादमध्ये आहेत.
-
A Sharma - Pujara partnership is developing off the field too 💙
— Mumbai Indians (@mipaltan) February 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Here's a cute birthday wish from Samaira for Cheteshwar Pujara's daughter Aditi 🥳🎂#OneFamily #MumbaiIndians @ritssajdeh pic.twitter.com/m7aJ2gHjLy
">A Sharma - Pujara partnership is developing off the field too 💙
— Mumbai Indians (@mipaltan) February 22, 2021
Here's a cute birthday wish from Samaira for Cheteshwar Pujara's daughter Aditi 🥳🎂#OneFamily #MumbaiIndians @ritssajdeh pic.twitter.com/m7aJ2gHjLyA Sharma - Pujara partnership is developing off the field too 💙
— Mumbai Indians (@mipaltan) February 22, 2021
Here's a cute birthday wish from Samaira for Cheteshwar Pujara's daughter Aditi 🥳🎂#OneFamily #MumbaiIndians @ritssajdeh pic.twitter.com/m7aJ2gHjLy
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली चार सामन्याची कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. उभय संघातील तिसरा सामना अहमदाबाद येथे दिवस-रात्र पद्धतीने खेळला जाणार आहे. २४ फेब्रुवारीपासून या सामन्याला सुरूवात होईल. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाची आहे. या मालिकेच्या निकालावर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा फायनलिस्ट मिळणार आहे. न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पात्र ठरला आहे.
हेही वाचा - राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होणार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाचे उद्घाटन
हेही वाचा - IND vs ENG: फिटनेस टेस्ट पास; उमेश यादवचा भारतीय संघात परतला