चेन्नई - आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होत आहे. या आयपीएलचे प्रमुख आकर्षण म्हणजे बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट न खेळलेला धोनी या स्पर्धेच्या माध्यमातून परतणार आहे. मागील वर्षी पार पडलेल्या ५० षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर धोनीने एकही सामना खेळला नव्हता. मात्र, तो यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. तत्पूर्वी, तो चेन्नईमध्ये सराव करत असून त्याच्या सरावाच्या व्हिडिओने स्टेडियममधील उपस्थित चाहते आणि नेटकरी 'घायाळ' झाले आहेत.
हेही वाचा - 'आळशी रवी शास्त्रीला लगेच हाकला', नेटकरी भडकले
आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नईचा संघ गतविजेत्या मुंबईशी सलामीचा सामना खेळणार आहे. तत्पूर्वी, धोनी कंपनीने सोमवारपासून एमए चिदंबरम स्टेडियमवर सरावाला सुरूवात केली. धोनी मैदानात उतरताच त्याचे चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
A grand waltz to take guard! #StartTheWhistles #SuperTraining 🦁💛 pic.twitter.com/tQbDqqnmT2
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A grand waltz to take guard! #StartTheWhistles #SuperTraining 🦁💛 pic.twitter.com/tQbDqqnmT2
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 2, 2020A grand waltz to take guard! #StartTheWhistles #SuperTraining 🦁💛 pic.twitter.com/tQbDqqnmT2
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 2, 2020
यावर्षी टी-१० विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी, विशेषत: धोनीसाठी खूप महत्त्वाची असणार आहे.