शारजाह - महिलांच्या चॅलेंजर्स टी-२० स्पर्धेत स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील ट्रेलब्लेझर्स आणि हरमनप्रित कौरचा सुपरनोव्हाज यांच्यात फायनल होणार आहे. या स्पर्धेत सुपरनोव्हाजकडून खेळणाऱ्या चमारी अट्टापट्टूने संघाकडून तडाकेबंद कामगिरी केली आहे. ट्रेलब्लेझर्स विरुद्धच्या सामन्यात तिने दमदार अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली.
-
On the mic 🎙️: Super four from #Supernovas
— IndianPremierLeague (@IPL) November 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Fun on the microphone with Supernovas quartet @selman_shakera, @JemiRodrigues, @ImHarmanpreet & Chamari Athapaththu. This one's a laugh riot.
WATCH 👉https://t.co/7ROkkv4C2I #JioWomensT20Challenge pic.twitter.com/6B6sk1BiG4
">On the mic 🎙️: Super four from #Supernovas
— IndianPremierLeague (@IPL) November 8, 2020
Fun on the microphone with Supernovas quartet @selman_shakera, @JemiRodrigues, @ImHarmanpreet & Chamari Athapaththu. This one's a laugh riot.
WATCH 👉https://t.co/7ROkkv4C2I #JioWomensT20Challenge pic.twitter.com/6B6sk1BiG4On the mic 🎙️: Super four from #Supernovas
— IndianPremierLeague (@IPL) November 8, 2020
Fun on the microphone with Supernovas quartet @selman_shakera, @JemiRodrigues, @ImHarmanpreet & Chamari Athapaththu. This one's a laugh riot.
WATCH 👉https://t.co/7ROkkv4C2I #JioWomensT20Challenge pic.twitter.com/6B6sk1BiG4
सामन्यानंतर चमारी अट्टापट्टूने पॉवर-हिटिंग मागील रहस्य सांगितले आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सुपरनोव्हाजच्या सेलमन, जेमिमा रॉड्रिग्स, हरमप्रीत कौर आणि अट्टापटू यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात, जेमिमा अट्टापटूला प्रश्न विचारते, त्यावर तीन मसाला डोसा आणि मसाला ऑम्लेट हे माझ्या पॉवर हिटिंगचे रहस्य असल्याचे अट्टापटूने सांगताना पाहायला मिळत आहे.
अट्टापट्टूची दमदार खेळीच्या जोरावर सुपरनोव्हाजने तिसऱ्यांदा फायनल गाठली आहे. सोमवारी जेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने सुपरनोव्हाजचा संघ मैदानात उतरेल. दुसरीकडे स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील ट्रेलब्लेझर्सला पहिल्या जेतेपदाची प्रतिक्षेत आहे.
हेही वाचा - Women's T20 Challenge: अटीतटीच्या सामन्यात सुपरनोव्हाजचा ट्रेलब्लेझर्सवर २ धावांनी विजय
हेही वाचा - भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा: विराट दोन कसोटीतून घेणार माघार?; 'हे' आहे कारण...