मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेला उद्यापासून (ता.१२) सुरूवात होणार आहे. उभय संघात पाच सामन्याची मालिका खेळवण्यात येत आहे. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याला या मालिकेत एक विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चहलने एक गडी बाद केला तर तो भारतासाठी आंतराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरेल. सद्यघडीला हा विक्रम भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावे आहे. बुमराहचा हा विक्रम मोडण्याची चहलला नामी संधी आहे.
३० वर्षीय चहलने आतापर्यंत ४५ टी-२० सामने खेळी आहेत. यात त्याने २४.६८ च्या सरासरीने ५९ गडी बाद केले आहेत. तर दुसरीकडे बुमराहने ५० टी सामन्यात ५९ गडी बाद केले आहेत.
दरम्यान, इंग्लंड संघाविरोधात चहलची कामगिरी आतापर्यंत उल्लेखनीय ठरली आहे. त्याने सहा सामन्यात इंग्लंडचे ९ गडी बाद केले आहेत.
भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
- जसप्रीत बुमराह : सामने : ५० | विकेट : ५९
- युझवेंद्र चहल : सामने : ४५ | विकेट : ५९
- रविचंद्रन अश्विन : सामने : ४६ | विकेट : ५२
- भुवनेश्वर कुमार : सामने : ४३ | विकेट : ४१
- कुलदीप यादव : सामने : २१ | विकेट : ३९
हेही वाचा - IPL २०२१ : विराटच्या RCB संघाला जबर धक्का; 'या' खेळाडूची स्पर्धेतून माघार
हेही वाचा - 'भीमकाय' क्रिकेटरला पाहून सचिन म्हणाला, मला अशी शरीरयष्टी तयार करण्यास किती ऑम्लेट खावे लागतील?