ETV Bharat / sports

भारत-ऑस्ट्रेलिया संघामध्ये रंगणार पाच कसोटी सामन्यांची मालिका? - ind vs australia upcoming series news

रॉबर्ट्स यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पत्रकारांना सांगितले, की येत्या हंगामात पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांबाबत निश्चितता नाही, परंतु बीसीसीआय आणि सीएचे संबंध खूप मजबूत असल्याचे मी म्हणू शकतो.

CA gives indications of 5-match Test series with India
भारत-ऑस्ट्रेलिया संघामध्ये रंगणार पाच कसोटी सामन्यांची मालिका?
author img

By

Published : Apr 21, 2020, 6:13 PM IST

ब्रिस्बेन - क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (सीए) मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स यांनी या वर्षाच्या अखेरीस भारताबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे. या दौर्‍यावर भारताला चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. तरी नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत एका कसोटी सामन्याचा समावेश होण्याचे संकेत रॉबर्ट्स यांनी दिले आहेत. बीसीसीआयशी आपले संबंध प्रबळ असल्याचे सांगत रॉबर्ट्स म्हणाले, की पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची शक्यता आहे, परंतु याक्षणी काहीही निश्चित नाही.

रॉबर्ट्स यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पत्रकारांना सांगितले, की येत्या हंगामात पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांबाबत निश्चितता नाही, परंतु बीसीसीआय आणि सीएचे संबंध खूप मजबूत असल्याचे मी म्हणू शकतो.

"आम्ही भविष्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही दोघेही वचनबद्ध आहोत. २०२३च्या वेळापत्रकापूर्वी आपण ते अस्तित्त्वात आणू शकतो का? हा प्रश्न आपल्यासमोर आहे. पुढचा हंगाम काय आहे हे आम्हाला माहित नाही, परंतु बदलत्या वातावरणात आम्ही ही शक्यता नाकारू शकत नाही", असेही रॉबर्ट्स यांनी सांगितले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.