नवी दिल्ली - वेस्ट इंडीजचा दिग्गज माजी फलंदाज ब्रायन लाराने भारताचा फलंदाज सुरेश रैनासोबत इंस्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे. "हा तरुण कोण आहे ??? मला वाटते की हा चाहत्याचा क्षण आहे. नंतर हा एक विशेष खेळाडू ठरला. 2003", असे लाराने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
लाराच्या या पोस्टला रैनानेही उत्तर दिले. तो म्हणाला, "निश्चितपणे आणि ती एक विशेष आठवण होती." रैनाने 2002-03 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने भारतीय संघात पदार्पण केले होते.
- View this post on Instagram
Who are these youths?? Fan moment I understand! He turned out to be a special player. #2003 #tell
">
वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लाराने 16 वर्षांपूर्वी एक खास विक्रम रचला होता. तो विक्रम आज घडीपर्यंत अबाधित आहे. 12 एप्रिल 2004 साली लाराने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळताना 582 चेंडूत नाबाद 400 धावांची अविश्वसनीय खेळी केली.