मॅनचेस्टर - शिखर धवननंतर आता वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारही भारतीय संघातून बाहेर पडला आहे. काल खेळण्यात आलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान भुवनेश्वर गोलंदाजी करताना जखमी झाला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना कर्णधार विराट कोहलीने सांगितले की. भुवनेश्वरची दुखापत मोठी नाही. मात्र त्याच्या पायाचा स्नायू दुखावल्यामुळे तो आगामी २ ते ३ सामन्यांना मुकणार आहे.
-
CWC'19: Bhuvneshwar Kumar to miss India's next two-three matches
— ANI Digital (@ani_digital) June 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI story | https://t.co/GqTm2Qj63G pic.twitter.com/2DLLLU0eGm
">CWC'19: Bhuvneshwar Kumar to miss India's next two-three matches
— ANI Digital (@ani_digital) June 17, 2019
Read @ANI story | https://t.co/GqTm2Qj63G pic.twitter.com/2DLLLU0eGmCWC'19: Bhuvneshwar Kumar to miss India's next two-three matches
— ANI Digital (@ani_digital) June 17, 2019
Read @ANI story | https://t.co/GqTm2Qj63G pic.twitter.com/2DLLLU0eGm
भुवीला रविवारी पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करताना उजव्या पायाचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्याला सामना सोडून मैदानाबाहेर जावे लागले होते. भुवनेश्वरच्या जागी आता संघात दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमीला खेळेल अशी माहिती कोहलीने दिली आहे.
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत काल खेळल्या गेलेल्या पाक आणि भारत यांच्यातील लढतीत भारताने पाकवर 89 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला.