दुबई - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला आयसीसीकडून मानाचा पुरस्कार मिळाला आहे. मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे भुवीला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी निवडण्यात आलं आहे.
भुवीने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली होती. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करताना भुवीने प्रभावी मारा करत छाप सोडली होती. त्याच्या या कामगिरीमुळे चाहते आणि आयसीसी वोटिंग अॅकडमी यांच्या आधारावर त्याला मार्च महिन्यातील 'प्लेयर ऑफ द मंथ' म्हणून निवडण्यात आलं आहे.
प्लेयर ऑफ द मंथ ठरल्यानंतर भुवीने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'खूप दिवसानंतर मी पुनरागमन केलं होते. भारताकडून पुन्हा खेळून मला आनंद होत आहे. दुखापती दरम्यान, मी फिटनेस आणि स्किल यांच्यावर लक्ष्य केंद्रित केले. आता देशासाठी खेळताना विकेट घेऊन आनंद होत आहे. या प्रवासात माझे कुटुंबीय, मित्र आणि सहकारी खेळाडूंनी साथ दिली. यांचे मी आभार मानू इच्छितो. याशिवाय मी आयसीसी वोटिंग अॅकडमी आणि सर्व चाहत्यांना देखील धन्यवाद देऊ इच्छितो, ज्यांनी मला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ बनवण्यात योगदान दिलं.'
लिजेल ली महिला प्लेयर ऑफ द मंथ
महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेची खेळाडू लिजेल ली हिला वूमन्स प्लेयर ऑफ द मंथसाठी निवडण्यात आले. तीने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, एक शतक आणि दोन अर्धशतक झळकावले आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी दिल्या गुढी पाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा
हेही वाचा - IPL २०२१: कोलकात्यासमोर मुंबईचं तगडं आव्हान; मागील १२ सामन्यात फक्त १ विजय, जाणून घ्या आकडेवारी