नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेला टी-२० मालिकेत मायदेशात ३-०ने हरवल्यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्सने संघाचे कौतुक केले आहे. ''सध्याचा इंग्लंड संघ संपूर्ण सामर्थ्याने खेळल्यास जगातील कोणत्याही संघाला हरवू शकेल'', असा विश्वास स्टोक्सने व्यक्त केला. जेव्हा आम्ही एकजुटीने खेळतो, तेव्हा हा संघ संघ कोठे जाऊ शकतो याचा विचार करणे ही एक भीतीदायक बाब असल्याचेही स्टोक्सने सांगितले.
हेही वाचा - विराटचा वनडेत भीमपराक्रम, क्रिकेटच्या देवाला टाकले मागे
पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाच, दुसर्या सामन्यात चार आणि तिसऱ्या सामन्यात नऊ गडी राखून दक्षिण आफ्रिकेला नमवले. स्टोक्स म्हणाला, "एक संघ म्हणून आम्ही आमच्या संघाच्या क्षमतेबद्दल पूर्ण आत्मविश्वास बाळगतो. आम्ही जे काही केले ते स्वतःवर लक्ष केंद्रित करत केले आहे. आम्ही इतर संघांच्या ताकद, कमकुवत बाजुकडे पाहतो. परंतु आम्ही नेहमी स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याकडे भर दिला आहे."
स्टोक्स म्हणाला, "आम्हाला माहीत आहे, की जर आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ खेळला तर आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो, असे म्हणणे अभिमानास्पद आहे. आम्ही त्याच स्थितीत आहोत. आम्हाला माहीत आहे, की हा संघ किती मजबूत आहे. या संघाचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे."
आज शुक्रवारपासून इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.