साऊथम्प्टन - इंग्लंड संघाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू आणि कर्णधार बेन स्टोक्सने विंडीजविरूद्धच्या सामन्यात विक्रम रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा आणि 150 बळी घेणारा तो दुसरा वेगवान खेळाडू ठरला आहे. न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या स्टोक्सने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हा विक्रम केला. त्याने पहिल्या डावात चार बळी टिपले.
-
Ben Stokes clean bowls Alzarri Joseph he now has 150 Test wickets! 🎉 #ENGvWI SCORECARD ▶️ https://t.co/J9IrapSl4x pic.twitter.com/8BgMEySYOp
— ICC (@ICC) July 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ben Stokes clean bowls Alzarri Joseph he now has 150 Test wickets! 🎉 #ENGvWI SCORECARD ▶️ https://t.co/J9IrapSl4x pic.twitter.com/8BgMEySYOp
— ICC (@ICC) July 10, 2020Ben Stokes clean bowls Alzarri Joseph he now has 150 Test wickets! 🎉 #ENGvWI SCORECARD ▶️ https://t.co/J9IrapSl4x pic.twitter.com/8BgMEySYOp
— ICC (@ICC) July 10, 2020
स्टोक्सने इंग्लंडचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. आयसीसीनेही या विक्रमाबद्दल स्टोक्सचे अभिनंदन केले आहे. या यादीमध्ये वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिस, भारताचे कपिल देव आणि माजी न्यूझीलंड कर्णधार डॅनियल व्हेटोरी यांचा समावेश आहे. सोबर्स यांनी 63 कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता, तर स्टोक्सने 64 कसोटी सामन्यात ही कामगिरी नोंदवली.
या सामन्याच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सने 7 चौकारांसह 43 धावा केल्या. तर, विंडीजविरूद्ध गोलंदाजी करताना 49 धावांत 4 बळी घेतले. कोरोनानंतरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय आणि ऐतिहासिक सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद होते. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघातील कसोटी मालिकेतून क्रिकेट परतले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना बुधवारपासून सुरू झाला. तथापि, कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही बदल केले आहेत, त्यानुसार ही मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवली जात आहे.